सुशोभीकरणाच्या शुल्कातील ५ टक्के वाढ तूर्तास टळली

A 5 per cent increase in beautification charges was immediately avoided

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मालमत्ता कर वाढ, अग्निसुरक्षा शुल्क वाढ, पाणी पट्टीत वाढ याला विरोध केल्यानंतर कर वाढ टळली. त्यानंतर खाजगी संकुलातील सुशोभीकरणाच्या शुल्कात ५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. परंतु पालिका प्रशासनाने अपुरी माहिती दिल्याने सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

संकुलांमध्ये कारंजे, सुशोभित हौद, दगडांच्या खडकांच्या कलाकृती,कृत्रिम धबधवे अशा प्रकारचे सुशोभीकरण करायचे असल्यास महानगर पालिकेच्या किटकनाशक विभागाची परवानगी घ्यावी लागते. तसेच,त्यासाठी शुल्कही द्यावे लागते.यासाठी वार्षिक ६’हजार ५०० रुपये शुल्क तसेच २० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागते. या शुल्कात पाच टक्के वाढ करुन ते ६ हजार ८२५ रुपये करण्यात येणार आहे.तसेच,अनामत रक्कम २० हजारावरुन २१ हजार रुपये करण्यात येणार आहे. मात्र फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही प्रकारच्या शुल्क वाढीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. दरम्यान, खाजगी संकुलातील सुशोभीकरणाच्या शुल्कात वाढ झाल्यानंतर पालिकेच्या तिजोरीत वर्षांला २ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न जमा होणार आहे. A 5 per cent increase in beautification charges was immediately avoided

SW/KA/PGB

4 Aug 2021