राज्यात सेमी कंडक्टर प्रकल्पात ३६ हजार कोटींची गुंतवणूक

 राज्यात सेमी कंडक्टर प्रकल्पात ३६ हजार कोटींची गुंतवणूक

ठाणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकसीत भारतामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रात मोठ मोठे उद्योग आले आहेत. राज्य इंडस्ट्री फ्रेंडली झालं आहे. तसाच सेमी कंडक्टर हा प्रकल्प आहे. सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत आहे. सेमी कंडक्टर चीप ही माणसांच्या आयुष्यात महत्वाचं असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबईत महापे इथं केलं.

महाराष्ट्रातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. सेमी कंडक्टर चीप हा प्रकल्प आरआरपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामार्फत हा उभा करण्यात येत आहे. दोन टप्यात हा प्रकल्प होणार असून इटली आणि फ्रान्स सरकारचा यामध्ये २७% वाटा आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २४ हजार ५३८ कोटी एवढी गुंवतणूक करण्यात येणार आहे. दोन्ही टप्यातील घटकाची महाराष्ट्रातील एकूण गुंतवणूक ३६ हजार ५७३ कोटी एवढी असणार आहे.
राज्यात उद्योग क्षेत्राला कॅपिटल सबसिडी आहे. रेड कार्पेट सुविधा आहेत. एक खिडकी योजना असल्यामुळे उद्योग क्षेत्र विकसित होत आहे. एमएमआर क्षेत्रच नव्हे तर गडचिरोली सारख्या भागातही औद्योगिक क्षेत्र विस्तारत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

SL/ML/SL

18 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *