डाॅ. मोहन आगाशे यांना गदिमा पुरस्कार जाहीर

मुंबई,दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने काल विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते डाॅ. मोहन आगाशे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध चित्रकार साधना बहुळकर यांना विद्याताई माडगूळकर स्मृती गृहिणी सखी सचिव पुरस्कार जाहीर झाला आहे.

गदीमा प्रतिष्ठानचे अन्य पुरस्कार

चैत्रबन पुरस्कार – दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे

विद्या प्रज्ञा पुरस्कार – युवा गायिका योगिता गोडबोले

ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १४ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. ज्येष्ठ नाटककार आणि समीक्षक सुरेश खरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमात पत्नी शीतल श्रीधर माडगूळकर यांनी लिहिलेल्या आठवणींवर आधारित ‘गदिमांच्या पंचवटीतून’ या पुस्तकाचे प्रकाशन  होणार आहे. उत्तरार्धात गदिमांचे बंधी डाॅ. अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ ‘गदिमा आणि लता’ हा गदिमा गीतांचा कार्यक्रम महक संस्थेच्या मनीषा निश्चल आणि सहकारी सादर करणार आहेत.

SL/KA/SL

3 Dec. 2022