जिल्हा परिषदेची चालती बोलती शाळा.

वाशिम दि २२: विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर आणि पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या टनका या गावातील जिल्हा परिषदेची शाळेचे नूतनीकरण करण्यात आले असून शाळेचा परिसर विविध शैक्षणिक चित्रांनी रंगविण्यात आला आहे. Unique ZP School Washim

बाहेरून पाहल्यास एखादी रेल्वे गाडी वाटावी अशी वर्गांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. पैनगंगा एक्सप्रेस असे त्या वर्गावर चित्रीत केलेल्या रेल्वेगाडीला नाव देण्यात आले आहे. प्राणी, पक्षी, बोधवाक्य आणि सुविचारांने शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या असून शाळेचे अंतरंग आणि बाह्य प्रांगण प्रसन्न वाटत आहे.

ML/KA/SL

22 Sep. 2022