इमारतीचा स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू

ठाणे, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  उल्हानगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे, कॅम्प पाच मध्ये असलेल्या मानस टॉवर या पाच मजली इमारती चा स्लॅब दुपारी कोसळून ही दुर्घटना घडली आहे.

सदर इमारत दोन वेळा धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित केली होती, आज दुसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब तळ मजल्यापर्यंत खाली आला , त्यात चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.

या इमारतीत ३० सदनिका होत्या एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती पालिका आयुक्त अझीझ शेख यांनी दिली. मदत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे, संपूर्ण ढिगारा उपसून आणखी कोणीही अडकलेले नाही याची खात्री करून घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ML/KA/SL

22 Sep. 2022