व्हिडिओ कॉल करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील महत्त्वाचे शहर बॉम्बने उडवण्याची धमकी नुकतीच मिळाली आहे. मुंबईला बॉम्बने उडवण्याची निनावी धमकी सांताक्रूझ येथील एका रहिवाशाला व्हिडिओ कॉलने मिळाली आहे. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Threatened to bomb Mumbai by video call

सांताक्रूझ येथील एका रहिवाश्याला एका अज्ञात इसमाने व्हिडिओ कॉल केला आणि मुंबई बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने तात्काळ पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तक्रार दाखल केली. अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करुन घेऊन मुंबई पोलीसांनी अधिक तपासासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबईनगरी ही कायमच या भीतीच्या सावटाखाली असते. असे निनावी धमकीचे फोन यापूर्वीही अनेक वेळा येऊन गेल्याने पोलिसांनी मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पण एका सामान्य व्यक्तीला अशाप्रकारे व्हिडिओ कॉल करुन धमकी दिल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सुत्रांकडून कळते.Threatened to bomb Mumbai by video call

ML/KA/PGB
23 Sep.2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*