मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे धोक्यात

नवी दिल्ली, दि. २०: आज आशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) च्या ४७ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आणि २० व्या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, सचिव अपूर्व चंद्रा आणि एआयबीडी संचालिका श्रीमती फिलोमिना ज्ञानप्रगासम हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनुराग ठाकूर यांनी मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांबद्दल चिंता व्यक्त केली.

या वेळी बोलताना श्री ठाकूर म्हणाले,” मुख्य प्रवाहातील माध्यमांना सर्वात मोठा धोका हा नवीन युगातील डिजिटल प्लॅटफॉर्मचा नसून मुख्य प्रवाहातील मीडिया चॅनेलचा आहे. खरी पत्रकारिता ही वस्तुस्थितीला सामोरे जाणे, सत्य मांडणे आणि सर्व बाजूंना मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे असते.”

Union Minister for Information and Broadcasting Anurag Thakur today inaugurated the 47th Annual Gathering and 20th Meeting of Asia-Pacific Institute for Broadcasting Development (AIBD) Thakur has said that the biggest threat to mainstream media is not from new age digital platforms, but rather the mainstream media channel itself.

ठाकूर पुढे म्हणाले की,”वृत्तवाहिन्यांवर विविध विषयांवरील चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलेले वक्ते कर्णकर्कश आवाजात ओरडून चुकीची माहिती पसरवत असतात. ध्रुवीकरण करणाऱ्या चर्चात्मक कार्यक्रमामुळे दर्शकांच्या मनात वाहिन्यांची विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांमुळे यापुढे प्रेक्षक असे कार्यक्रम सादर करणाऱ्या वृत्तवाहिन्यांकडे कायमची पाठ फिरवतील.मोडतोड न करता केवळ बातम्यांचे वृत्तांकन करणे हेच पत्रकारांचे कर्तव्य असते.”

ठाकूर यांनी AIBD च्या संचालक, श्रीमती फिलोमिना, AIBD जनरल कॉन्फरन्सचे अध्यक्ष श्री. मयंक अग्रवाल आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात कोविड साथीच्या काळात जबाबदारीने एकत्र काम करणाऱ्या सदस्य देशांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी २०२१ आणि २०२२ साठीच्या AIBD पुरस्कारांचे वितरण केले. रेडिओ टेलिव्हिजन ब्रुनेईला २०२१ साठी प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०२२ चा प्रशंसा पुरस्कार अर्थव्यवस्था, नागरी सेवा, दळणवळण, गृहनिर्माण आणि समुदाय विकास मंत्रालय, फिजी रिपब्लिक आणि फिजी ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन यांनी विभागून देण्यात आला.

२०२१ चा AIBD जीवनगौरव पुरस्कार कंबोडियाचे माहिती आणि दळणवळण मंत्री श्री खियू खानहरिथ यांना प्रदान करण्यात आला. तर २०२२ साठी AIBD जीवनगौरव पुरस्कार श्री मयंक अग्रवाल, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि AIBD अध्यक्ष यांना प्रदान करण्यात आला. Lifetime Achievement Award for 2022 was conferred on Shri Mayank Agarwal, CEO, PB and President, AIBD.
SL/KA/SL
20 Sep. 2022