या विदेशी तंतू वाद्याची निर्मिती आता आपल्या देशातही

या विदेशी तंतू वाद्याची निर्मिती आता आपल्या देशातही

सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशी तंतुवाद्यासोबत पहिल्यांदाच विदेशी तंतुवाद्य हार्प बनविण्याचा मान मिरज शहरास मिळाला. त्यामुळे तंतुवाद्य क्षेत्रात प्रथमच क्रांती झाली.

सतारमेकर गल्ली, मिरज ही तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. देशी विदेशी तंतुवाद्य तयार करण्याचा हातखंडा असल्याने इथे तयार होणाऱ्या तंतुवाद्यांला जगाच्या कानाकोपऱ्यात मागणी आहे.The production of these foreign string instruments is now also in our country

आज देशी तंतुवाद्या सोबत विदेशी तंतुवाद्य तयार करण्याचा मान जी एस मुझिकल्सला मिळाला.जी एस टीमची तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात चौथी पिढी कार्यरत आहे. वाद्य निर्मितीमध्ये त्यांचा हातखंडा आहे. देशातील नामांकित सांस्कृतिक संस्थेने पाच महिन्यांपूर्वी हार्प हे विदेशी तंतुवाद्य तयार करण्याची मागणी नोंदविली होती.

अमेरिका, कॅनडा आणि पाश्चात्य देशात इसपूर्व 3 हजार पूर्वीपासून हार्प तंतुवाद्य वाजवले जाते, याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात पाहायला मिळतो. विदेशात हे तंतुवाद्य तयार केले जात असल्याने देशात या तंतुवाद्यांची निर्मिती कधी झाली नव्हती. पण जी एस मुझिकल्स टीमने पाच महिने अथक परिश्रम करून सहा फुटी आणि 40 स्वरांचे भारतीय बनावटीचे हार्प तंतुवाद्य तयार करण्यात प्रथमच यश मिळवले.

पाश्चात्य रोमन हस्तशिल्प या हार्पवर कोरण्यात आले आहे. भारतीय बनावटीचा हार्प तयार करण्यात स्थानिक कारागिराना यश आल्याने मिरजेच्या लौकिकात भर पडली आहे.

ML/KA/PGB
19 Sep.2022