इम्रान हाश्मीच्या आगामी चित्रपटात झळकणार ही अभिनेत्री

इम्रान हाश्मीच्या आगामी चित्रपटात झळकणार ही अभिनेत्री

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):बॉलिवूडचा अभिनेता इम्रान हाश्मी याच्या आगामी चित्रपटाच्या विषय निवडीमुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आला आहे. तेजस देवस्कर दिग्दर्शित ‘ग्राउंड झिरो’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये सध्या इम्रान हाश्मी काश्मीरमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात एक मराठी अभिनेत्री दिसणार असल्याचे नुकतेच समजले आहे.The actress will appear in Emraan Hashmi’s upcoming film

इम्रान हाश्मी ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात लष्करी अधिकारी म्हणून दिसणार आहे. त्याच्या या मिलिटरी ड्रामामध्ये सई ताम्हणकर ही अभिनेत्री एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय झोया हुसेनची देखील महत्त्वाची भूमिका असल्याचे कळले आहे. सई आणि इम्रान ऑन स्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.सई या लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या भूमिकेत असेल.The actress will appear in Emraan Hashmi’s upcoming film या फ्रेश जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का नाही हा कुतुहलाचा विषय असेल.
यापूर्वी सई ताम्हणकर हंटर, मीमी सारख्या हिंदी चित्रपटात दिसली होती.

ML/KA/PGB
20 Sep.2022