४२ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या स्टँडअप कॉमेडीयनचे निधन

नवी दिल्ली,दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे आज दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. १० ऑगस्ट रोजी ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.प्रशिक्षकाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली होती. मात्र त्यांची प्रकृती सातत्याने खालावत जाऊन चिंताजनक झाली होती. गेली ४२ दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर आज त्यांनी शेवटचा श्वास घेतला..
Raju Srivastava Dies At 58, India Loses Comedy’s Shining Star.

५८ वर्षी राजू श्रीवास्तव यांनी आपल्या खुमासदार विनोदांनी रसिकांना भुरळ घातली होती. देशातील सर्वोत्कृष्ट हास्य कलाकारांपैकी आघाडीचे कलाकार अशी त्यांची ओळख होती. अनेक टीव्ही शोज त्यांनी गाजवले. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ The Great Indian Laughter Challenge या स्टँडअप कॉमेडी शोने त्यांना ओळख मिळवून दिली.

त्यांचबरोबर ‘बिग बॉस’, ‘शक्तिमान’,‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. त्यांनी ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘बॉम्बे टू गोवा’ ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’, यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले होते. He had featured in films like Maine Pyar Kiya, Aamdani Atthanni Kharcha Rupaiya, Main Prem Ki Deewani Hoon, Bombay to Goa, Bajigar, Big Brother etc.

SL/KA/SL
21 Sep. 2022