मेळाव्यासाठी शिवसेना हायकोर्टात

मुंबई दि २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दादरच्या शिवाजी पार्क इथेच आपला परंपरागत दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अखेर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

शिवसेना नेमकी कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेकडे केली होती.त्यावर पालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

पालिकेच्या विधी विभागाने त्यावर अहवाल तयार केला असून तो अंतिम निर्णयासाठी आयुक्तांकडे गेला आहे, मात्र शिवसेना अद्याप नेमकी कोणाची यावर न्यायालयीन वाद सुरू असल्याने हे मैदान कोणालाही देऊ नये असाच निर्णय होण्याची शक्यता जास्त आहे.

अनेकवेळा भेट घेऊन आणि स्मरणपत्र देऊनही निर्णय होत नसल्याने काल शिवसेना कार्यकर्ते पालिका विभाग कार्यालयावर धडकले होते , शेवटी आज ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर तातडीच्या सुनावणीची मागणी केली आहे.

ML/KA/SL