दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाही, उद्या सुनावणी

मुंबई दि २२  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यासाठी ची परवानगी महानगरपालिकेने शिवसेनेच्या दोन्ही गटांना नाकारली आहे, यावरची उच्च न्यायालयातली सुनावणी उद्या होणार आहे.

दसऱ्याला मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पालिकेकडे केली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे संबधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी कळवले असल्याने कोणालाही इथे परवानगी देता येणार नाही असे पालिका उपायुक्तांनी दोन्ही गटांना कळविले आहे.

दरम्यान शिवाजी पार्क इथेच आपल्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तशीच याचिका शिंदे गटाने दाखल केली आहे त्यावरची सुनावणी उद्या होणे अपेक्षित आहे.

The High Court will hear tomorrow that the Municipal Corporation has denied permission to both factions of the Shiv Sena to hold a Dussehra gathering at Shivaji Park.

ML/KA/SL

22 Sep. 2022