रिक्षाचालकाला लागली ३० कोटीची लॉटरी

केरळ, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देनेवाला जब भी देता, देता छप्पर फाड के…असंच काहीसं घडलं आहे केरळ मधील एका ३० वर्षीय युवकाच्या बाबतीत…३० वर्षीय रिक्षाचालकाला लागली आहे ३० कोटीची लॉटरी.

केरळ राज्यात ‘ओणम बंपर २०२२’ या केरळ राज्य लॉटरी डिपार्टमेंटच्या वतीने आयोजित लॉटरीचा नुकताच निकाल लागला असून याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्रीवराहम येथील अनुप या रिक्षाचालकास लागले आहे.

अनुप याला या रकमेचे काय करणार विचारले असता मलेशियात जाऊन शेफ म्हणून जायची त्याची इच्छा असून त्यासाठीच त्याने नुकतेच ३ लाखाचे लोन ॲप्लिकेशन दिले होते. आणि जे स्वीकारले गेले. तेव्हा त्याच्या या स्वप्नासाठी या रकमेचा वापर करणार असल्याचे त्यांने सांगितले.

भगवती एजन्सीकडून अनुपने हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.Rickshaw driver won 30 crore lotteryकेरळ लॉटरी नियमानुसार जिंकलेल्या रकमेतील १५.७५कोटी अनुपला टॅक्स दिल्यानंतर हातात मिळणार आहेत.

ML/KA/PGB
19 Sep.2022