मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू

पुणे, दि.२०(एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या पंधरवड्यापासून राज्यासह देशभरातही अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी पावसाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राच्या कमी पावसाच्या क्षेत्रातही यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी भाजीपाला आणि अन्य खरिपाची पिके धोक्यात आली आहेत.

राज्यातील बहुतांश धरणे देखील भरली असून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करायला लागल्याने नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरीक धास्तावले आहेत. मान्सून माघारी कधी फिरतो याकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय हवामान विभागाने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान तयार होत असून येत्या दोन दिससांत मौसमी पाऊस राजस्थान,पंजाब, हरयाणा आणि लगतच्या कच्छच्या काही भागातून माघारी परतण्यास सुरूवात होत आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली. Favorable weather conditions are forming for the return journey of Monsoon from Northwest India and monsoon rains are beginning to withdraw from Rajasthan, Punjab, Haryana and parts of adjoining Kutch in the next two days. This information was given by the Indian Meteorological Department.

त्याचबरोबर येत्या आठ-दहा दिवसांत महाराष्ट्रातून देखील मान्सून टप्प्याटप्प्याने माघार घेणार आहे. गेल्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मान्सून परत फिरत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामान राहील. हवामान विभागाच्या या माहितीमुळे अतीपावसामुळे त्रस्त झालेला शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरीक यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
SL/KA/SL
20 Sep. 2022