राज्यात १८ नवी आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे

मुंबई,दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून निसर्गचक्रात मानवी हस्तक्षेपामुळे जागतिक तापमान वाढ झाल्याने अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळे असे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. संरक्षित वनक्षेत्र वाढवल्यास तापमान वाढीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे पर्यावरण तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. Maharashtra  State Wildlife Board has decided to declare 18 new and seven proposed conservation reserve forest areas in the state

राज्यात १८ नवी आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषीत करण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाने घेतला आहे.त्यामुळे राज्यातील संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या आता ५२ होणार असून सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित होणार आहे. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्यालगत किंवा दोन संरक्षित क्षेत्र जोडणाऱ्या भूप्रदेशातील प्राणी, वनस्पती यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या हेतूने संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत केले जातात.

 • राज्यात १८ नवी संवर्धन राखीव क्षेत्रे
  पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे-मुळशी आणि लोणावळा,
  पुणे-ठाणे जिल्ह्यातील नाणेघाट,
  पुणे जिल्हा भोरगिरीगड,
  नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा, ताहाराबाद, नंदूरबार जिल्ह्यातील कारेघाट, चिंचपाडा,
  रायगड जिल्ह्यातील घेरा माणिकगड आणि अलिबाग,
  ठाणे पुणे जिल्ह्यातील राजमाची,
  ठाणे जिल्ह्यातील गुमतारा,
  पालघर जिल्ह्यातील जव्हार, धामणी, अशेरीगड, सांगली जिल्ह्यातील आटपाडी,
  चंद्रपूर जिल्ह्यातील एकारा
  ही वनसंवर्धन राखीव क्षेत्रे घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्रांमध्ये नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रंगी गड, ठाणे जिल्ह्यातील मोरोशीचा भैरवगड, औरंगाबाद जिल्ह्यातील धारेश्वर, त्रिकुटेश्वर, कन्नड, पेडकागड तर नांदेड जिल्ह्यातील किनवट चा समावेश आहे.

SL/KA/Sl

22 Sep. 2022