प्रशांत किशोर आता वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर..

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील वेगळ्या विदर्भाची मागणी मागच्या सहा दशकांपासून असून त्या लढ्याला बळकटी देण्यासाठी प्रशांत किशोर विदर्भवादी नेत्यांची मदत करायला पुढे आले आहेत.Prashant Kishor now on a different issue of Vidarbha..

आज प्रशांत किशोर यांनी विदर्भवादी संघटनांची भेट घेतली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केल्याची चर्चा आहे. वेगळ्या विदर्भाची रणनीती ठरवण्यापूर्वी त्यांनी विदर्भाची मागणी करणाऱ्या आंदोलकांची, राजकीय पक्षांची, विचारवंतांशी भेट घेऊन चर्चा करण्यासाठी ते नागपुरात मॅरेथॉन बैठका घेत आहेत.

ML/KA/PGB
20 Sep.2022