पत्राचाळ प्रकरणी आरोप खोटे ठरले तर काय …

मुंबई दि. २१ सप्टेंबर (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पत्राचाळ प्रकरणात माझी किंवा कुणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशीला आम्ही तयार आहोत. चार – आठ – दहा दिवसात म्हणजे जेवढ्या लवकर करता येईल तितक्या लवकर चौकशी करा मात्र चौकशी झाल्यानंतर जो आरोप करण्यात आला आहे त्यात वास्तव आणि सत्याला धरुन नसेल तर आरोप करणार्‍यांच्या विरोधात काय भूमिका घेणार हे राज्यसरकारने जाहीर करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सरकारला दिले. What if the allegations in the Patra Chawl case are false…

ज्यावेळी ही बैठक झाली त्यावेळचे इतिवृत्त ज्या अधिकार्‍याने सही केली ते माध्यमांना देत असून त्यानंतर जे कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे त्याच्यात माझे नाव आहे असे माध्यमातून बोलले जात आहे त्या आरोपपत्रात नक्की काय आहे ते त्यांच्या पान नंबर सातवर आणि आठवर असेल त्याची कॉपी तुम्हाला दिली आहे. म्हणजे जी चौकशी करणारी एजन्सी आहे ती कोर्टात काय मांडते आणि राज्यसरकारची त्यावेळी जी चर्चा झाली त्याची टिप्पणी ते काय म्हणतात त्या दोन्ही कॉपी याची स्वच्छ भूमिका सांगितली आहे असेही शरद पवार म्हणाले.

यावेळी माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पत्राचाळ प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती माध्यमांना दिली. त्यावेळी जी बैठक झाली त्याचे इतिवृत्त गृहनिर्माणचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या सहीचे पत्रासहीत माध्यमांसमोर ठेवले. बैठका घेऊन मध्यममार्ग काढणं, संवाद साधणं चुकीचं आहे का असा सवाल करतानाच वेगवेगळ्या बैठकांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

ML/KA/SL

21 Sep. 2022