अतिवृष्टीमुळे शाळांना एक दिवस सुट्टी

धुळे, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): धुळे शहरात काल रात्रभर झालेल्या पावसाने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे शहरात वाहणारे नाले तसेच नाल्या काठाचा परिसर, स्लम एरिया तसेच कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.One day off for schools due to heavy rain

देवपूरात सखल भागात भरत नगर, तुळशीराम नगर, जितेंद्र नगर ,वलवाडी शिवारातील कॉलनी परिसर जलमय झाला आहे धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात देखील रात्रभर जोरदार पाऊस झाला. यात देवभाने कापडणे परिसर तसेच नेर कुसुंबा पट्ट्यात देखील जोरदार पाऊस झाला.

धुळे शहरात रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे अध्यक्ष व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धुळे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांना आज १९ सप्टेंबर रोजी एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.

ML/KA/PGB
19 Sep.2022