मेट्रो-3 स्थानकांच्या नामकरणातून तब्बल दोनशे कोटींची कमाई

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई मेट्रो लाईन 3 स्थानकाच्या नामकरण अधिकारातून येत्या ५ वर्षात तब्बल २०० कोटींहून अधिक उत्पन्न प्राप्त होणार आहे. More than 200 crores of income will be received from the naming rights of Mumbai Metro Line 3 station in the next 5 years.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने मेट्रो-3 कॉरिडॉरच्या पाच स्थानकांना लाईन सुरू झाल्यापासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी नामकरण अधिकार नुकतेच प्रदान केले आहेत. स्टेशन नामकरण अधिकारांचे एकूण मूल्य ५% वार्षिक वाढीसह ५ वर्षांमध्ये एकत्रितपणे २१६ कोटी इतके होईल. Mumbai Metro Lane 3

कोटक महिंद्रा बँकेला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि CSMT मेट्रो स्टेशन्स ज्या मेट्रो स्टेशन्सना नाव देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत; सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन चे नामकरण अधिकार ICICI लोम्बार्ड ला तर चर्चगेट तसेच हुतात्मा चौक मेट्रो स्टेशन चे नामकरण अधिकार लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) यांना दिले आहेत , विजेत्या ब्रँड्सना स्टेशनच्या आत ब्रँडिंग स्पेस मिळेल, ट्रेनच्या घोषणांमध्ये आणि स्टेशनच्या नकाशा मध्ये त्यांचा उल्लेख केला जाईल, त्याव्यतिरिक्त त्यांच्या ब्रँडचे नाव संबंधित स्टेशनवर स्टेशनच्या नावावर प्री-फिक्सिंग केले जाईल.

“एमएमआरसी लाईन 3 ला स्टेशन नामकरण अधिकारांसाठी कोटक महिंद्रा बँक, एलआयसी आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड सारख्या नामांकित ब्रँडशी संलग्न करण्यात आनंद झाला आहे. नॉन-फेअर बॉक्स महसूल निर्माण करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे, जे निधी मिळणे सुलभ करेल आणि तिकिट दर वाजवी ठेवण्यास मदत करेल, असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. भिडे पुढे म्हणाल्या “दरवर्षी प्रति स्टेशन 8 कोटी रुपये ($1.1 मिलियन) एवढी सरासरी भारताला मिळणार आहे. ही सरासरी भारतातच काय अख्या जगात सर्वाधिक आहे, दुबई, माद्रिद, जकार्ता, क्वालालंपूर मधील मेट्रो मार्गांना ही ती मागे टाकत आहे , ज्यांचे प्रति स्टेशन वार्षिक सरासरी $1 मिलियन पर्यंत आहे.

ML/KA/SL

21 Sep. 2022