मुंबई गोवा महामार्ग पुन्हा खड्ड्यात

अलिबाग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गोवा महामार्गावरील On Mumbai Goa Highway पेण, वडखळ,पांडापूर, आमटेम, नागोठणे, वाकण, सुकेळी, खांब, कोलाड, तिसे रातवड, इंदापूर,गावाचे हद्दीपर्यंत रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे प्रवासीवर्ग व वाहनचालकांना मोठी तारेवरची कसरत करत सामोरे जावे लागते आहे.Mumbai Goa highway in pothole again

या खड्ड्यांमुळे दैनंदिन प्रवास करताना प्रवासी वर्गाचे जीव अगदी मेटाकुटीला येत आहेत. शिवाय महामार्गावरील प्रवासही नकोसा वाटू लागला आहे. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले असून ठिकठिकाणी पडलेले खड्यांमुळे सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडलेला माणूस हा पुन्हा माघारी घरात परत येईल की नाही याची गॅरंटी देता येत नाही.

ML/KA/PGB
19 Sep.2022