सतीश आळेकर यांना विष्णूदास भावे पुरस्कार जाहीर

सांगली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, पद्मश्री सतीश आळेकर यांना नाट्यक्षेत्रातील अत्यंत मानाचा विष्णूदास भावे पुरस्कार नुकताच जाहीर झाला. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समिती, सांगली यांच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे हे ५५ वे वर्ष आहे. Playwright, Director, Producer, Padma Shri Satish Alekar has recently been announced the prestigious Vishnudas Bhave award in the field of theatre.

१९५९ मध्ये बालगंधर्वांना हा पुरस्कार सर्वप्रथम देण्यात आला होता.५ नोव्हेंबर रोजी जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने डॉ,जब्बार पटेल यांच्या हस्ते सतीश आळेकर सरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. विष्णुदास भावे गौरव पदक, 25 हजार रोख रुपये, शाल श्रीफक असे, या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या बरोबरीने नाटककार म्हणून आळेकर यांचे नाव घेतले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते.

बेगम बर्वे, आधारित एकांकिका, अतिरेकी, दुसरा सामना,महानिर्वाण,महापूर, पिढीजात/ मिकी आणि मेमसाहेब, शनिवार रविवार,झुलता पूल आणि इतर एकांकिका ही त्यांची प्रमुख ९ नाटके मुंबई येथील पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. ठकीशी गप्पा या त्यांच्या आगामी नाटकाचे अभिवाचन येत्या २५ सप्टेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदीर येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या नऊ नाटकांच्या नव्या आवृत्तीच्या संचाचे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल.

SL/KA/SL

22 Sep. 2022