या दिवशी होणार ‘महाकाल कॉरिडॉर’ चे लोकार्पण

उज्जैन, दि.२० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारच्या कार्यकाळात देशभरातील प्राचिन धार्मिक स्थळांच्या पुनरुज्जीवनाचे आणि सर्वागिण विकासाचे विविध प्रकल्प पूर्णत्वास नेले जात आहेत. काशी येथील विश्वनाथ मंदीर परिसराचा झालेला विकास, अयोध्या येथील प्रस्तावित राममंदीर, गंगा नदी शुद्धीकरण प्रकल्प अशा विविध प्रकल्पांमधून धार्मिक क्षेत्रांचा विकास घडवून भव्यदिव्य आणि स्वच्छ स्वरूपात धार्मिक स्थळांचा विकास झाला आहे. Ujjain Mahakal Corridor Project on 20 hector land. The country’s first night garden has also been set up here.

या धर्मस्थळ विकास प्रकल्पांच्या मांदियाळीत आता अजून एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ विकसित होत असून ११ ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. मध्यप्रदेशातील उज्जैन येथे वसलेले श्री. महाकालाचे मंदीर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र आहे.या ठिकाणी आता २० हेक्टर जागेवर ‘महाकाल कॅरिडॉर’ विकसित केला जात आहे. येथे देशाचे पहिले नाइट गार्डनही उभारण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ ऑक्टोबर रोजी महाकाल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करतील अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी उज्जैन भेटीदरम्यान दिली. हा प्रकल्प पौराणिक मान्यता असलेल्या रुद्रसागर सरोवरच्या काठाला विकसित होत आहे. शिव, शक्ती आणि इतर धार्मिक आख्यायिकांशी संबंधित जवळपास २०० मूर्ती आणि म्यूरल्स (भित्त चित्रे) यांच्या माध्यमातून या कॉरिडॉरचे सुशोभिकरण करण्यात येत आहे.
काशीविश्वनाथ परिसरापेक्षा ४ पट मोठ्या असलेल्या ७९३ कोटी रुपयांच्या या भव्य प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यातील परिसराच्या विकासकामे आता अंतिम टप्प्यात आली आहे.
SL/KA/SL
20 Sep. 2022