‘या’ सर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक

नवी दिल्ली,दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक अभिरुची निर्माण व्हावी म्हणून शासनस्तरावरही विविध प्रयत्न केले जातात. इनोव्हेशन इन सायन्स पर्सुइट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च’ (INSPIRE) योजना ही केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) च्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक आहे. यांच्याद्वारे आयोजित नवव्या ‘इन्स्पायर अॅवॉर्ड मानक’ स्पर्धेत देशभरातील ६ वी ते १० या इयत्तांमधील साडेसहा लाख विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पना मांडल्या होत्या. त्यापैकी ५५६ विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर निवडले गेले होते. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ९ विद्यार्थ्यांची टॉप ६०मध्ये निवड झाली आहे. INSPIRE Awards-MANAK, Innovation in Science Pursuit for Inspired Research (INSPIRE) scheme is one of the flagship programmes of Department of Science.

सातारा जिल्ह्यातील वाई येथील यश ज्ञानेश्वर शिंदे याने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या पथकाला राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूरच्या संचालिका गुजर तसेच राष्ट्रीय नवप्रवर्तन संस्था, अहमदाबादचे समन्वयक पार्थ पवार यांचे मार्गदर्शन लाभले राज्याच्या पथकाचे नेतृत्व राज्य विज्ञान विक्षक राजू नेब, डीआयईटी नाशिकच्या अधिव्याख्याता डॉ. भारती बेलन, रमेश कोरे, राज्य बाल विज्ञान परिषद कार्यकारिणी सदस्य प्रसन्न खडसे यांनी केले
SL/KA/SL
१८ Sep. 2022