या खेळाडूंना वगळून ‘टी 20 वर्ल्ड कप’ची ही असेल रोहितसेना…

मुंबई, दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या ICC T20 WORLD CUP साठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल याच्या पुनरागमन झाले असून जखमी जडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. ५ ऑक्टोबरला आपला संघ ऑस्ट्रेलियात रवाना होणार आहे. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीखाली हा संघ खेळणार आहे.
तेव्हा T20 WORLD CUP ची रोहितसेना पुढीलप्रमाणे असेल,

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँड बाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

बीसीसीआयच्या माहितीनुसार आत्ता चालू असणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेदरम्यान हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार हे फिटनेस ट्रेनिंगसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल आहेत.

Trimity/KA/SL

22 Sep. 2022