मेळावा शिवाजी पार्क इथेच, निकालाला आव्हान

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्क इथेच दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे.The Shinde group has decided to go to the Supreme Court against this decision.

आमचा मेळावा हा परंपरागत असून त्यासाठी आम्हाला शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी अशी मागणी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली होती.Gathering at Shivaji Park right here, challenging the result

त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे, हा शिवसेनेचा विजय असून आमचा परवानगी अर्ज सूडबुद्धीने नाकारण्यात आला असा आरोप सेना नेते अनिल परब यांनी केला आहे. न्यायालयाच्या निकालाचा आदर आहे, मात्र अधिक माहिती आम्ही आमच्या वकिलांकडून माहिती घेऊन पुढील निर्णय करू असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाने राज्यभर जल्लोष साजरा करीत फटाके वाजवून आनंद व्यक्त केला, ठिकठिकाणी पेढे वाटून त्यांनी न्यायलायाच्या निर्णयाचे स्वागत केले.

ML/KA/PGB
23 Sep.2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*