अखेर नगर आष्टी रेल्वे सुरू

बीड, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या मार्च 2023 पर्यंत अहमदनगर बीड परळी प्रकल्प बीड पर्यंत नेणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.Finally Nagar Ashti Railway started महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठप्प झालेले रेल्वे प्रकल्प पुन्हा सुरू झाले असून सर्वाधिक निधी मोदी यांच्या सरकारच्या काळात या प्रकल्पाला मिळाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील नगर आष्टी रेल्वेचा शुभारंभ हिरवा झेंडा दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला.यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे,खासदार डॉ सुजय विखे,राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार बाळासाहेब आजबे, यांच्यासह रेल्वे विभागातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते
यावेळी मुख्यमंत्री हे दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

यावेळी बोलताना दानवे म्हणाले की,
बीड परली रेल्वे ही गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न होते .ते साकार करण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले .2014 नंतर बजेटमध्ये तरतूद मोदी यांनी केली, हा प्रकल्प 4805 कोटीचा असून दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने एक दमडी दिली नाही ,देवेंद्र फडणवीस आल्याने हे निधी उपलब्ध करून दिला आहे.या प्रकल्पच 96 टक्के जमीन अधिग्रहण झाले, असून त्यासाठी पैसे कमी पडू दिले जाणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले .

आगामी मार्च 2023 पर्यंत बीड पर्यंत नेणार असल्याचे त्यांनी सांगितले .रेल्वे मध्ये झपाट्याने प्रगती होत असून 3500 किमीचे इलेक्ट्रिफिकेशन झाले असून नगर पासून इलक्ट्री फिकेशन मंजूर झाले, 2014 ते 22 या काळात रेल्वेची प्रगती होत असून 400 वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यातील 120 ट्रेन लातूर च्या कारखान्यात तयार होणार आहेत असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पसाठी सर्वात जास्त कष्ट मुंडे यांनी केले म्हणून त्यांना श्रद्धांजली म्हणून हे काम झाले पाहिजे असेही ते म्हणाले.

आतापर्यंत जो निधी 2000 कोटी केंद्र दिला गेला त्यापैकी 1800 कोटी नरेंद्र मोदी यांच्या काळात दिला गेला.1200 कोटी रुपये हे सरकार आल्यावर देण्यात आले होते. महा विकास आघाडी ने राज्य सरकारचा वाटा म्हणजेच 50 टक्के निधी देणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे रेले मार्ग बंद पडले होते ,नवीन सरकार झाल्यानंतर पुन्हा सुरू केले आणि 250 कोटीचा निधी मंजूर केले.
मुंडे यांचं पूर्ण स्वप्न तेंव्हाच पूर्ण होईल रेल्वे परली बीड पर्यंत जाईल .असेही ते म्हणाले.Finally Nagar Ashti Railway started

ML/KA/PGB
23 Sep.2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*