घोणस अळीचा शिरकाव; शेतकरी संकटात ..

वाशिम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बहुभक्षीय विषग्रंथी असलेली घोणस अळी (डंख अळी) मंगरूळपीर व रिसोड तालुक्यात आढळल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. या अळीने मानवाला डंख केल्यास त्वचेचे व इतर रिॲक्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Farmers in trouble. या अळीच्या व्यवस्थापनासाठी नेमक्या उपाययोजना काय कराव्या? याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. Farmers are expecting this.

या अळीच्या बारीक केसात, काट्यात विषग्रंथी असून काटा त्वचेमध्ये टोचल्यास अळी विषारी रसायन त्वचेमध्ये सोडत असल्याने खूप आग होते. त्वचा लाल होणे, त्वचेचे रिअॲक्शन, त्वचा सुजणे, डोळे लाल होणे, खूप आग होणे, ॲलर्जी अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. दमा आजाराचा व्यक्ती अळीच्या संपर्कात आल्यास तीव्र प्रकारची लक्षणे दिसतात, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

वाशीम जिल्ह्यातील शेलूबाजार परिसरात जवळपास प्रत्येक गावातून घोणस अळी आढळत असल्याची माहीती मिळत आहे. काल माळशेलू येथील कविता चव्हाण या महिलेला या अळीचा स्पर्श झाल्याने तिला उपचारार्थ अकोला येथे दाखल केले. त्यापुर्वी घोणस आळी येडशी येथे आढळून आली तर आज नजीकच्या इचा येथे सुध्दा एका युवकाला त्या अळीचा स्पर्श झाल्याने त्या युवकाला उपचारासाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

ML/KA/PGB
20 Sep.2022