एस इ बी सी च्या २३५ मुलांचे भवितव्य धोक्यात

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : महावितरण आणि सामान्य प्रशासनाच्या गोंधळ कारभारामुळे आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील २३५ मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे.  त्यामुळे नियुक्ती मिळण्यासाठी शेकडो उमेदवारांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनास बसले आहेत. The fate of 235 Candidates belonging to the economically weaker sections is at risk due to the confusion of Mavitaran and general administration.

२०१९ पासून आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवार नियुक्ती पासून वंचित ठेवले गेले आहे. ९ सप्टेंबर २०२० ला एस इ बी सी आरक्षण रद्द केल्यामुळे तत्कालीन सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील निवड होऊन सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या उमेदवाराच्या विरोधात शासन निर्णय काढला की, पूर्वलक्षी प्रभावाने एस ई बी सी उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकातून लाभ देता येईल. या राज्य शासनाच्या शासन निर्णयाविरोधात आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांनी आव्हान दिले आणि मुंबई उच्च न्यायालयाचा २९ जुलै २०२२ रोजी निकाल आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराच्या बाजूने लागला. निकाल लागून दोन महिने होत आले असले तरी देखील महावितरणने अद्याप पर्यंत नियुक्त्या दिल्या नाहीत. आर्थिक दुर्बल घटकातील निवड झालेल्या उमेदवाराच्या भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे जाहिरातीच्या आदिन राहून प्रक्रिया पूर्ण करावे. असा न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट आदेश असतानाही महावितरण प्रशासन नियुक्ती देत नाही.

राज्य शासन ने एस ई बी सी आरक्षणातून नोकर भरतीतील बाधित झालेल्या उमेदवारांना आधीसंख्या पद निर्माण करण्याचे पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडून परित केले. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला होता. परंतु, महावितरणने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे नियुक्तीचा वाद आणखीनच किचकट झाला आहे. आता या दोन प्रवर्गातील उमेदवारात न्यायालयीन वाद लावून राज्य शासन या मुलांच्या भवितव्याशी खेळत आहे. त्याच्या निषेधार्थ व तात्काळ नियुक्ती मिळण्याकरिता आर्थिक दुर्बल घटकातील संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्हयातील उमेदवारांनी काल पासून आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलनास सुरुवात केली आहे.

SW/KA/SL

22 Sep. 2022