अबब! ‘ब्रह्मास्त्र’ने ओलांडला इतके कोटींचा टप्पा, मोडला भूलभुलैय्या २ चा रेकॉर्ड

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. अयान मुखर्जीने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि नागार्जुन असे दिग्गज कलाकारही विविध भूमिकेत पाहायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या दिवसापासूनच चित्रपटाने भरपूर कमाई केली. आता मात्र त्याने नवा टप्पा गाठला आहे.’Brahmastra’ crossed the milestone of so many crores

आज मितीला ३५० कोटींचा टप्पा ब्रह्मास्त्रने पार केला आहे.पहिल्या दिवशी ३६.४२ कोटी तर पहिल्या आठवड्यात १७३ कोटींचा बिझनेस केला असून दुसरा आठवडा अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करणारा ठरला आहे. ही कमाई आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक झाली असून याची काही खास कारणे आहेत. ब्रह्मास्त्रला फाईट देणारा कोणताही मोठा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर नसल्याने हा प्रतिसाद असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर व्हिएफएक्स इफेक्ट्स हा या चित्रपटाचे खास आकर्षण आहे.’Brahmastra’ crossed the milestone of so many crores २०२२ मधील सर्वात मोठा हिट ‘भुलभुलैय्या २’ चा रेकॉर्ड मोडत ब्रह्मास्त्रने हा आकडा पार केला आहे. २०२२ चा सेकंड हायेस्ट हिंदी ग्रॉसर सिनेमा ठरला आहे.

ML/KA/PGB
19 Sep.2022