आयुर्वेद उपचारच शाश्वत

अहमदनगर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आयुर्वेद हे जीवनाचे उपचार शास्त्र असुन त्याला ऋषीमुनींची मोठी परंपरा लाभली आहे. आतापर्यंत सर्वच पिढ्यांनी आयुर्वेदाचा वारसा जोपासून समृद्ध केल्याने अखंड विश्वाने तो स्वीकारला आहे.बाहेरील उपचार पद्धतीचे अनिष्ट परिणाम होत असून केवळ आयुर्वेद उपचार पद्धती शास्वत आहेत , त्यामुळे या आयुर्वेद शास्त्र जगभर वर्चस्व मिळविल असा ठाम विश्वास राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ प्रशासक समितीचे अध्यक्ष पद्मभूषण, पद्मश्री डॉ.देवेंद्र त्रिगुणा यांनी व्यक्त केला.Ayurveda treatment is eternal

त्यांच्या हस्ते तसेच महंत जंगलीदास माऊली यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र आयुर्वेद सम्मेलन आयोजित आणि आयुष मंत्रालय केंद्र सरकार प्रायोजित आयुर्वेद पर्व २०२२ या तीन दिवसीय आयुर्वेद संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आत्मा मलिक ध्यानपिठ जंगली आश्रमात या संमेलनाला सुरुवात झाली असुन हे संमेलन रविवार दिनांक २५ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.The conference will continue till Sunday 25th September.

या संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी माजी आमदार व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी भारतीय आयुर्वेद परंपरेची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले.डॉ. देवेंद्र त्रीगुणा यांच्यासह देशभरातील आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. रामदास आव्हाड यांनी प्रास्ताविक भाषण केले.

त्रिगुणा यांनी पुढे सांगितले की , या संमेलनाप्रमाणे उत्तर प्रदेश, कर्नाटक, जगन्नाथ पुरी आदी पाच ठिकाणी आयुर्वेद महासंमेलने भरविण्यात येणार आहे.या संमेलनात देशातील २१५० आयुर्वेद डॉक्टरांनी तसेच नगर, नाशिक, औरंगाबाद येथील आयुर्वेद महाविद्यालयातील २००० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

भारतीय प्राचीन आयुर्वेद परंपरेची सद्यस्थिती, संशोधने, आयुर्वेद क्षेत्रा पुढील आव्हाने आणि त्यातून भविष्यात करावयाची वाटचाल यासंबंधी उपस्थित मान्यवरांकडून विचार मंथन करण्यात येणार आहे.

आज आयुर्वेद आहार हा उत्तम आरोग्याचा आधार यासह विविध विषयावर आयोजित कार्यशाळेत सहभागी तज्ञ आयुर्वेदिक डॉ. राकेश शर्मा, डॉ. साक्षी शर्मा, डॉ. तपणकुमार वैद्य, डॉ. मनोज नेसरी, डॉ. तनुजा नेसरी मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच तीनही दिवस या संमेलनात आयुर्वेद शास्त्राच्या विविध आयामावर आधारित कार्यशाळा, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असुन त्यात सहभागी नामवंत आयुर्वेद क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्स आणि अन्य तज्ञांचे उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन लाभणार आहे. या संमेलनात ८५ शोधनिबंध व पेपर पोस्टर्स प्रस्ताव सादर केले आहेत. माजी आमदार व प्रदेश भाजपच्या सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी यावेळी बोलताना सांगतले की, प्राचीन भारतीय आयुर्वेद शास्त्राचा समृद्ध वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी जतन करुन विश्वासाने पुढे नेत आहेत.

रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी समारोप प्रसंगी भारत सरकार, आयुष मंत्रालयाचे सचिव डॉ. राजेश कोटेचा व सुप्रसिद्ध सांडू फार्मास्युटिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशांक सांडू यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.Ayurveda treatment is eternal

या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश राज्यातील विविध ५८ आयुर्वेद उत्पादक कंपन्यांच्या औषधी उत्पादनांचे व १५० आयुर्वेदिक वनस्पतींचे प्रजातींचे तसेच मार्गदर्शन पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे.

ML/KA/PGB
23 Sep.2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*