थेट सरपंच निवडीचे आण्णा हजारे यांनी केले समर्थन

अहमदनगर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात लोकशाही टिकवायची असेल तर गावातला सरपंच हा गावकऱ्यांनीच निवडून दिला पाहीजे असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे.Anna Hazare supported direct election of Sarpanch आज अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी मध्ये आयोजित केलेल्या सरपंच परिषदेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

फक्त भाषणाने गाव बदलत नाही तर सरपंचासोबत निवडून आलेल्या सदस्यांच्या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले पाहिजे यासाठी ग्रामस्थांमधून सरपंचाची निवड व्हायला हवी असे मत अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केले.

आदर्श गाव योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यावेळी म्हणाले की, गावे स्वावलंबी झाल्याशिवाय देश बलशाली होऊ शकत नाही आणि गावे तेव्हा स्वावलंबी होतील जेव्हा गावाला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व मिळेल. लोकशाही बळकट करून गावातील रोजगार वाढविण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला पाहिजे असे मत पवार यांनी व्यक्त केले.Anna Hazare supported direct election of Sarpanch

थेट जनतेतून सरपंच व्हावा ही सरपंच परिषदेची मागणी होती. कारण गावागावात जातीपातीचे राजकारण, सरपंच निवडीच्या वेळी होणारी पळवा पळवी आणि त्यातून होणाऱ्या हाणामाऱ्या यामुळे राज्यातील अनेक तरुण सरपंचावर गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणून गावातील गुंडगिरी संपवण्यासाठी आम्ही ही मागणी केली असे सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी सांगितले.President of Sarpanch Parishad Datta Kakade said that we have made this demand.

ML/KA/PGB
23 Sep.2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*