यूएस फेड आणि युरोपीयन सेंट्रल बँकेच्या आक्रमक दरवाढीच्या भीतीने बाजारपेठा विचलित.

मुंबई, दि. 3 (जितेश सावंत) :  यूएस फेडरल रिझव्र्हची कठोर भूमिका आणि युरोझोन आणि जपानमधील वाढत्या महागाईमुळे(hawkish US Federal Reserve stance and rising inflation in Eurozone and Japan) गेला संपूर्ण आठवडा हा भारतीय बाजारासाठी मोठ्या चढउताराचा राहिला.यूएस फेड आणि युरोपीयन सेंट्रल बँकेच्या आक्रमक दरवाढीच्या भीतीने जागतिक बाजारपेठा विचलित झाल्या.वाढलेली महागाई आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे जगभरातील शेअर बाजारांवर दबाव आला. पण त्याचबरोबर उत्तम ,मायक्रो डेटा आणि FII च्या खरेदीने(better macro data and FII buying)भारतीय बाजाराला खालच्या स्तरावर आधार मिळाला. मागील लेखात मी (२७ ऑगस्ट) नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने १७,१६६ व १७,७२५ हे दोन्ही स्तर एकाच आठवडयात गाठले ह्या वरूनच बाजार किती मोठ्या प्रमाणात अस्थिर होता ह्याची कल्पना येते.

पुढील आठवड्यात बाजाराचे लक्ष ५ सप्टेंबर रोजी जाहीर होणाऱ्या Global pmi data, ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांची घोषणा (uk new prime minister),opec+ meeting, ८ सप्टेंबर रोजी मॉनेटरी पॉलिसी वर फेड चेअरमन यांची घोषणा, ९ सप्टेंबर रोजी चीन मधील CPI,PPI चे आकडे,८ सप्टेंबर रोजी जपानचे GDP,BoP आकडे यावर असेल. ५ सप्टेंबर रोजी अमेरिकन बाजार बंद राहतील.

तांत्रिकदृष्ट्या या आठवड्यात बाजारासाठी निफ्टीचे १७,४००-१७,३३५ महत्वाचे स्तर आहेत हे तोडल्यास मागील आठवड्यातील १७,१६१ चा स्तर निफ्टी पुन्हा गाठू शकेल व मध्यम अवधीकरिता निफ्टी १६,९०० च्या पातळीपर्यंत घसरू शकते ,त्याचबरोबर जर निफ्टीने १७,६००,१७,७२५ चा स्तर अलगदपणे पार केला तर निफ्टी १७,८४३-१७,९२२ चा पल्ला गाठू शकेल. गुंतवणूकदारानी अत्यंत सावधगिरीने पावले उचलावी तसेच संधीचा फायदा उचलून दीर्घकाळाकरिता चांगल्या समभागांची खरेदी करावी.

सेन्सेक्स ८६१अंकांनी घसरला. Sensex tanks 861 points
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने महागाईला आळा घालण्यासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे व्याजदर वाढीबाबत नव्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाल्यामुळे जागतिक बाजार मार्केट गडगडले व त्याच्या असर भारतीय बाजरावर दिसला.Tech Mahindra, Infosys,Wipro,HCLTechnologies आणिTCS या समभागात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. दिवसभरात सेन्सेक्स जवळपास १,५०० अंकांनी पडला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ८६१ अंकांनी घसरून ५७,९७२ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २४६ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १७,३१२ चा बंद दिला.

सेन्सेक्स १,५०० अंकांनी वधारला.
मंगळवारी बाजाराने वापसी केली. सोमवारी झालेली पडझड मार्केटने भरून काढली व त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात तेजी केली. महिन्याच्या शेवटच्या व्यापाराच्या दिवशी बाजार पुन्हा उसळला. जागतिक इतर बाजारांच्या तुलनेत भारतीय बाजार अधिक मजबूत दिसले. सेन्सेक्स १,५०० अंकांनी वधारला. बुल्सनी बाजाराचा ताबा घेतला तसेच युरोपियन बाजारांच्या जोरदार सुरुवातीमुळे दुपारनंतर भारतीय बाजारात अधिक तेजी पसरली. मार्केटची वाढ मजबूत आणि स्थिर होती आणि नुकत्याच झालेल्या घसरणीनंतर शॉर्ट कव्हरिंग तसेच व्हॅल्यू बायिंगच्या माध्यमातून रिलीफ रॅलीचा एक भाग ठरली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,५६४ अंकांनी वधारून ५९,५३७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ४४६ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १७,७५९ चा बंद दिला.

सेन्सेक्स 770 अंकांनी घसरला. Sensex falls 770 points
एका दिवसाच्या विश्रांतीनंतर उघडलेला भारतीय शेअर बाजार गुरुवारी १ टक्क्यांहून अधिक घसरला. जागतिक बाजरातील पडझडीचा परिणाम भारतीय बाजारावर जाणवला.अमेरिकन बाजारातील सलग चार दिवसांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार चांगलेच घाबरले. यूएस फेड आणि युरोपीयन सेंट्रल बँकेच्या आक्रमक दरवाढीच्या भीतीने जागतिक बाजारपेठा विचलित झाल्या.वाढलेली महागाई आणि मंदावलेली अर्थव्यवस्था यामुळे जगभरातील शेअर बाजारांवर दबाव आला.रुपयाची घसरण हे देखील पडझडीचे कारण ठरले. Hindalco, Reliance, ONGC, TCS ह्या समभागात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स १,००० अंकांपेक्षा जास्त घसरला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ७७० अंकांनी घसरून ५८,७६६ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २१६ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १७,५४२ चा बंद दिला.

प्रचंड अस्थिरतेमुळे सेन्सेक्स, निफ्टीचा सपाट बंद. Sensex, Nifty end flat amid high volatility
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने उच्चांकी सुरुवात केली परंतु नफा वसुलीच्या चढाओढीने बाजार घसरला.आशियाई आणि युरोपियन बाजाराचे देखील संमिश्र संकेत होते. दिवसाच्या उत्तरार्धात यूएस नॉन-फार्म पेरोल डेटाच्या प्रतीक्षेत गुंतवणूकदार होते. हा डेटा यूएस मध्ये (शेती उद्योग वगळून) रोजगार असलेल्या लोकांच्या संख्येचा मागोवा घेतो. एक मजबूत रोजगार अहवाल यूएस फेडला त्याच्या सप्टेंबरच्या पॉलिसी बैठकीत व्याजदरांमध्ये आणखी एक तीव्र वाढ करण्यास प्रोत्साहित करेल परंतु इक्विटी मार्केटसाठी हे कदाचित चांगले ठरणार नाही. भारतीय बाजार दिवसभर अस्थिर राहिले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ३६ अंकांनी वधारून ५८,८०३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ०३ अंकांची मामुली घसरण होऊन निफ्टीने १७,५३९चा बंद दिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
3 Sep 2022