आदित्य ठाकरे कसबा गणपतीच्या पालखीचे मानकरी

पुणे, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुण्यात विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.Aditya Thackeray Kasba Ganapathi Palkhi Mankari विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आ. सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

आदित्य यांनी आज पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्रींच्या पालखीला काहीवेळ खांदा दिला.

त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या पुणे शहर पदाधिकाऱ्यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचेही Dagdusheth Halwai Ganapati  दर्शन करून आरती केली.

ML/KA/PGB
9 Sep 2022