अनोखा सायकल प्रवास. इंडिया गेट’वरून ‘गेट वे ऑफ इंडिया’कडे…

मुंबई दि २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : वाशीम ते लालबाग (मुंबई), वाशीम ते वाघा बॉर्डर (पंजाब), आणि वाशीम ते रामसेतू (तामिलनाडू) असा प्रत्येकी ६००, १८०० आणि २००० किलोमीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करून वाशिमच्या नारायण व्यास यांनी शारीरिक फिटनेससोबतच शांती, एकात्मता आणि पर्यावरण सरंक्षणाचा संदेश दिला आहे. A unique cycle journey. From India Gate to ‘Gateway of India’…

हा ध्येयवेडा सायकलपटू एवढ्यावरच न थांबता त्यांनी केलेल्या निर्धारानुसार, १५ सप्टेंबरपासून ते दिल्लीच्या इंडिया गेटवरून मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापर्यंत १५५१ किलोमीटरचा टप्पा सायकलने गाठण्यासाठी सध्या प्रवासात असून त्यांची ही सायकलवारी देशाचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला समर्पित आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात राज्यातील विवीध शहरांदरम्यान फिटनेसचा संदेश देत ते मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियापर्यंत पोहोचणार आहेत. १५५१ किलोमिटरचा हा प्रवास ७ दिवसात पूर्ण करणार असल्याचे व्यास यांनी सांगितले.

आणि वाटेतच भेटला ‘क्रिकेटचा देव’ सचिन……

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला समर्पित असलेली ही सायकल राईड पुर्ण करीत असताना मध्य प्रदेश मधील ईंदोर येथे नारायण व्यास यांची सचिन तेंडूलकर यांनी भेट घेतली.
रोड सेफ्टी क्रिकेट लीगसाठी सचिन ईंदोर येथे आला असताना त्यांनी नारायण यांच्याशी संपर्क करून सायकल राईडबद्दल आभार मानले तसेच सचिनने स्वतःची जर्सी ऑटोग्राफसह नारायण यांना भेट देउन शुभेच्छा दिल्या.

आज नारायण यांनी कसारा घाटातून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला . संध्याकाळी त्यांनी आपल्या या टप्प्यातील प्रवास पूर्ण करत आपला संदेश लोकांपर्यंत पोहचवला.

ML/KA/SL