शिक्षकांनी थकवले २५ कोटींचे कर्ज

शिक्षकांनी थकवले २५ कोटींचे कर्ज

सांगली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 25 कोटी रुपयांची कर्जे थकवली आहेत. संबंधित 350 शिक्षक आणि मुख्याध्यापकांना बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीसा पाठविल्या आहेत.25 crores of debt paid off by teachers

सांगली जिल्हा बँकेने शिक्षकांना 25 कोटी रुपयांची कर्जे दिली होती. यातील बहुतांश शिक्षकांना याच बँकेतून वेतन मिळत होते. त्यानंतर काही शिक्षकांनी आपले वेतन अन्य बँकातून करण्यासाठी प्रयत्न केले, त्यात त्यांना यशही आले. त्यामुळे जिल्हा बँकेची कर्जे थकली आहेत. विशेष म्हणजे जिल्हा बँकेची कर्जे देताना संबंधित शाळेचे मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांचे हमीपत्र घेतले आहे.

जिल्हा बँकेने सध्या कारवाई सुरू केली आहे. मात्र घेतलेली हमीपत्रे ठराविक नमुन्यात नसल्याचा गैरफायदा संबंधित शिक्षकांनी उचलला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षकाकडून नियमाप्रमाणे हमीपत्र घेण्याचे कामही सुरू आहे. 25 crores of debt paid off by teachers बँकेकडून थकीत कर्ज वसुलीसाठी मोहीम राबवली जात आहे.

एनपीएसाठी प्रशासनाचा सध्या संकल्प असून त्यासाठी सर्वच कर्जदारांना नोटीसा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये बडे कर्जदार संस्थांचाही समावेश आहे. त्यामुळे सर्व संस्था जिल्हा बँकेच्या टारगेटवर आहेत.

ML/KA/PGB
20 Sep.2022