GST च्या भाराने प्रकाशन क्षेत्र त्रस्त

मुंबई दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लॉकडाऊननंतर पूर्णपणे कोलमडून पडलेले पुस्तक प्रकाशन क्षेत्र आता कुठे तग धरू लागले आहे. मात्र पुस्तक निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावरील जीएसटी कर आकारणीमुळे प्रकाशकवर्गाला चिंतेने ग्रासले आहे. पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर १८% जीएसटी आकारला जातो. मात्र ग्राहकाला पुस्तक विकताना ते करमुक्त द्यावे लागते. त्यामुळे निर्मिती प्रक्रियेतील या वाढत्या कराचा परिणाम होऊन सप्टेंबरपासून पुस्तकांच्या किमतींमध्ये सुमारे ५०% वाढ होऊ शकते.  the impact of GST on books.50% Price Hike
सध्या राज्यात एक हजाराच्या आसपास प्रकाशन संस्था आहेत. प्रकाशन संस्थेकडून वर्षाकाठी साधारणपणे ८ ते १० पुस्तके प्रकाशित केली जातात. शाई, कागद, डिझाइन, बाइंडींग, वाहतूक यांच्या वाढत्या खर्चामुळे पुस्तकांची विक्री किमत आवाक्यात ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. त्यातच जीएसटीच्या बोजामुळे आता विक्री किंमतीत ५०% पर्यंत वाढ करणे अपरिहार्य झाल्याची खंत प्रकाशक वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
SL/KA/SL

9 August, 2022