
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला लागले आहे. दरम्यान राज्यात सत्तांतराची चिन्हे असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राजीनामा दिल्यास येत्या दहा जुलैला आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला होणाऱ्या शासकीय विठ्ठल पूजेचा मान कोणाला मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असल्याने महाविकास आघाडी सरकारचे संख्याबळ कमी झाल्याने ते पायउतार होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राज्यपाल बंडखोर गटासोबत भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण देतील का? याबाबत अद्याप अनिश्चितता आहे असे असले तरी आषाढी एकादशीपूर्वी फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यास फडणवीसांना शासकीय विठ्ठल पूजेचा मान मिळेल असे त्यांचे समर्थक बोलू लागले आहेत. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेचा वैधानिक पेच सुटल्यास नव्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही पूजा होणार का ? याबद्दल उत्सुकता लागली आहे.
HSR/KA/HSR/ 22 June 2022
Be the first to comment