राज्याच्या राजकारणात उलथा पालथ , सर्वसामान्यांचे काय…?

राज्याच्या राजकारणात उलथा पालथ , सर्वसामान्यांचे काय...?

मुंबई, दि. 22 ( मिलिंद लिमये ) : राज्याच्या सत्तारूढ आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेत चक्क सत्तेत असताना फूट पडली आहे,Shiv Sena has split while in power,  ज्याच्या हातात नगरविकास विभागासारखे महत्वाचे खाते आणि पक्षाच्या गटनेते पदाची जबाबदारी आहे तोच मंत्री थेट तब्बल पस्तीस आमदार घेऊन वेगळा होतो हे वरकरणी दिसते तितके साधे प्रकरण नाही हे एव्हाना बऱ्याच जणांच्या लक्षात आले असेल.

याबाबत एक शक्यता अशी की इतकी मोठी फूट उद्धव यांच्या सहमती शिवाय शक्य नाही.एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या गेम नुसारच बाहेर पडले आहेत. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या देहू भेटीदरम्यान त्यांची अजित दादांशी दिसलेली जवळीक आणि त्यानंतर विधान परिषद निवणुकीत झालेला गेम (?) यातून उद्धव सावध झाले असावेत का ? अजित दादा जर पुन्हा भाजप सोबत गेले तर काय होईल? What will happen if Ajit Dada joins BJP again? या शंकेने त्यांनी आपला सेनापतीच सरळ भाजपच्या गोटात पाठवला नसेल कशावरून.

एकीकडे आपल्या मुख्यमंत्री पदाला आवश्यक तेव्हढी अडीच वर्षे झाली आहेत , त्यात आता सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा असू शकेल Supriya Sule may have a claim on the post of Chief Minister ही एक बाबही आहे.असेही पद जाणार तसेही जाणार त्यापेक्षा भाजपा सोबत गेलो तर पुढील कारवाया तरी टाळता येतील शिवाय शिंदे यांच्यामार्फत का होईना सत्ता ही राखता येईल , स्वतः काही थेट भाजपाशी जुळवून घेऊ शकू अशी परिस्थिती सध्या तरी नाही , पक्षातील तोंड पाटीलकी करणाऱ्यांनी ती इतकी बिघडवून ठेवलीय , स्वतःही अनेक वक्तव्ये करून समोपचाराचे मार्ग बंद केलेले आहेत , म्हणून हा मार्ग नसेल हे कशावरून .. अर्थात याची सत्यात येता काळच ठरवेल.जर भविष्यात ठाकरे कुटुंब ED , CBI कचाट्यात आले नाही तर हेच गणित योग्य असे म्हणू शकतो.असेच केलेले असेल तर दिल्ली समोर झुकणार नाही ही भूमिका , आब आणि रुतबा तसाच राहील , शिवसैनिकांना सांगणेही सोपे जाईल.

अर्थात हे खरे नसेल तर मात्र सत्तेत असताना पक्ष प्रमुखाला इतके थेट आव्हान ,तेही शिवसेनेत म्हणजे शिस्तीच्या आणि आदेशावर चालणाऱ्या पक्षात हे आक्रितच. पक्षाकडे सध्या असलेल्या ५५ आमदारांपैकी तब्बल पस्तीस शिंदे यांच्याकडे असतील तर पक्षच त्यांच्या ताब्यात गेला असे म्हणावे लागेल. डॅमेज कंट्रोल साठी काल तातडीने बोलावलेल्या बैठकीत जेमतेम १८आमदार उपस्थित होते असे समजले , मग गटनेते पदाची नवीन नियुक्ती देखील कायद्याच्या कचाट्यात सापडेल , अर्थात विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे, त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार आहे , निर्णय ते घेणार म्हणजे सरकार वाचवण्याची सूत्रे पवारांच्या हातात अशी अजब तऱ्हा होऊन बसली आहे, उध्दव इथेच हतबल झालेले दिसतात , असे नसते तर आजवर शिवसेना नेतृत्वाने बंड करणाऱ्या नेत्याच्या नाकदुऱ्या कधीही काढलेल्या नाहीत , पण काल नार्वेकराना पाठवून तेही केले गेले.

आता या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार Sharad Pawar काय करतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे, मात्र सध्या तरी त्यांच्या हातात फार काही नाही , हा प्रकार म्हणजे शिवसेनेतील अंतर्गत बाब असल्याचे सांगत विरोधी बाकांवर बसण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितलेच आहे , अर्थात पवार बोलतात एक आणि करतात वेगळे हाच आजवरचा अनुभव आहे.

तिकडे काँग्रेस ची अवस्था सगळ्यात वाईट आहे , एकीकडे आपल्या पक्षाचा पराभव विधानपरिषदेच्या निवडणुकीत का झाला यावर चिंतन करायचे की सरकार आज पडेल की उद्या यावर चिंता करायची या विवंचनेत ते आहेत , सत्ता स्थापनेच्या वेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी सत्तेत सामील होऊ नका, बाहेरून पाठिंबा द्या असे दिवंगत अहमद पटेल यांना सांगितले होते , ते त्यावेळी तसे घडले असते तर आज काँग्रेसची अवस्था आजच्या सारखी वाईट नसती , मात्र तिथे कोणी कोणाला सांगायचे आणि कोणी कोणाचे ऐकायचे याच गोंधळात ते आहेत.

एकंदरीतच गेली अडीच वर्षे तिघांच्या विसंवादात चाललेला राज्याचा कारभार गेले दोन दिवस ठप्प झाला आहे , जनतेचे प्रश्न बाजूला सारत जो तो सत्ता टिकेल का या विवंचनेत असून त्यासाठी बैठकांची सत्रे चालली आहेत , सर्व सामान्याला यातून काय मिळेल याचे उत्तर मात्र मिळत नाही.The common man, however, does not know the answer to this question.

ML/KA/PGB

22 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*