परतलेले शिवसेना आमदार खोटे बोलत आहेत ….

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली असून पाटील यांची सुरत मधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्हीच व्यवस्था करून दिली असे स्पष्टीकरण बंडखोर गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे.Such an explanation has been given by the MLA of the rebel group Tanaji Sawant.

आज संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कैलास पाटील आणि नितीन देशमुख Nitin Deshmukh या आमदारांनी आपल्याला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे गटावर केला होता.

कैलास पाटील हे प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा असून ते आभासी कथानक रचून मातोश्रीची आमदार सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताहेत हे दुर्दैवी असल्याचेही सावंत यांनी सांगितले.

डबलढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्या पासून पक्ष प्रमुख यांनी देखील सावध राहावं असा इशाराही त्यांनी दिला, He also gave such a warning यासोबतच नितीन देशमुख यांनी आपल्याला कुटुंबीयांना भेटायचं आहे असे सांगितल्याने त्यांना चार्टर्ड विमानाने नागपूर विमानतळावर नेऊन सोडले असे त्यांना सोडणाऱ्या शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ जारी करत स्पष्ट केले आहे.

ML/KA/PGB

23 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*