नाईकनगर दुर्घटनेप्रकरणी घरमलकांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कुर्ला kurla येथील नाईक नगर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीची तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी नेहरूनगर पोलिस ठाण्यात घरमलकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कुर्ला येथील नाईक नगर naik nagar को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीची तीन माळ्याची इमारत 27 जून रोजी 11:30 वाजता सुमारास कोसळली . या दुर्घटनेत एकूण 19 रहिवाशांचा मृत्यू झाला . तर पंधरा जण जखमी झाले.

This building ही इमारत राहण्यास धोकादायक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी घोषित केले होते . तरी देखील घर मालक व इतर अनोळखी व्यक्तींनी ही इमारत भाडेकरू

रहिवाशांना राहण्यास दिली. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला व काही रहिवासी जखमी झाले . त्यांच्या मृत्यूस व जखमी होण्यास

कारणीभूत ठरल्या प्रकरणी घरमालक श्रीमती रजनी राठोड, किशोर नारायण चव्हाण , बाळकृष्ण राठोड ,व दिलीप विश्वास या चौघांविरुद्ध कलम 304( 2), 308 ,338, 337, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ML/KA/PGB

29 Jun 2022