
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय योग दिन International Yoga Day आज नागपूरातील ऐतिहासिक असलेल्या कस्तुरचंद पार्क येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. यावेळेला जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे, राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, विभागीय आयुक्त माधवी खोडे, जिल्हाधिकारी आर. विमला उपस्थित होते.International Yoga Day celebrated in Nagpur
8 वा योग् दिवस आपण साजरा करत आहो , दोन वर्षे हे आपल्याला करता आलं नाही. पंतप्रधानांची ही संकल्पना दूर पर्यंत पोहचली असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. अनेक देशात योग पोहचल आहे. मी रोज 1 तास योग करतो त्यामुळे माझं स्वास्थ्य चांगलं राहत असेही गडकरी म्हणाले.
ML/KA/PGB
21 Jun 2022
Be the first to comment