राज्यात राजकीय भूकंप, महाविकास आघाडी सरकार धोक्यात

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकार गटांगळ्या खात असून शिवसेनेमध्ये झालेल्या प्रचंड बंडाळीमुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेत पहिल्यांदाच उभी फूट पाडण्याचे चित्र असून बहुसंख्य आमदारांनी पक्षाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारले आहे.A majority of MLAs have revolted against the party under the leadership of Eknath Shinde.

आधी राज्यसभा आणि आता विधान परिषद निवडणुकीत तोंडावर आपटलेल्या शिवसेनेत काल रात्री भूकंप झाला, पक्षाचे मोठे नेते , विधानसभेतील गटनेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde. यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सुमारे पस्तीस आमदारांनी बंड पुकारून थेट गुजरात मधील सुरत गाठले आणि काल पासून ते तिथे तळ ठोकत कोणाच्याही संपर्कात राहिलेले नाहीत.

कालच्या निवडणुकीत शिवसेनेची तब्बल दहा मते फुटली होती , काँग्रेसची ही तीन मते फुटल्याचे दिसून आले होते.त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी तब्बल पस्तीस आमदार शिंदे Eknath Shinde.  यांच्या नेतृत्वाखाली सुरत मध्ये निघून गेले आणि शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली. ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचे महत्त्व मोठे असून शिवसेनेचे इथे असलेल्या वर्चस्व त्यांच्याच प्रभावाखाली आहे. ठाणे , पालघर मधील आठ महानगर पालिका त्यांच्याच प्रभावाखाली आहेत , लवकरच तिथे निवडणुका होणार आहेत त्यामुळे सरकारला निर्माण झालेल्या धोक्यासोबतच पक्षाला ही मोठा धोका आहे.

शिंदे Eknath Shinde.  यांच्या सोबत असणाऱ्या काही आमदारांच्या घरातून पोलीस तक्रारी करत त्यांना शोधून काढण्याची मागणी करण्यात आली आहे तर काही जण आपल्या संपर्कात असल्याचे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यांद्वारे स्पष्ट केले आहे.Sanjay Raut has clarified through the media.

दरम्यान शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी थेट मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यानाच सुरत ला पाठवले असून दुसरीकडे उर्वरित आमदारांची बैठक घेऊन शिंदे यांना गटनेते पदावरून हटवत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक केली आहे.

दुसरीकडे शिवसेनेच्या या स्थिती नंतर राज्यातील सत्तारूढ आघाडीच्या सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने दिल्लीमधील बैठक आटोपती घेत शरद पवार मुंबईत परतले आहेत तर चिंताग्रस्त काँग्रेसने कालच्या पराभवासोबत या नव्या संकटाला तोंड कसे द्यावे यावर चर्चा केली. आज रात्री उशिरा तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होत असून शिंदे यांच्याशी चर्चा काय होते त्यावरील पुढील रण निती ठरवली जाईल

ML/KA/PGB

21 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*