शिवसेनेत गटनेते पदाचा वाद, खासदार ही शिंदे यांच्या बाजूने

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शिवसेनेत shivsena झालेल्या मोठ्या बंडानंतर आता विधिमंडळ पक्षनेते पदाचा वाद निर्माण झाला असून विद्यमान गटनेते एकनाथ शिंदे यांनी आपण त्यावर कायम असल्याचा दावा केला असतानाच उर्वरित गटाने अजय चौधरी यांना गटनेते बनवले आहे. दरम्यान काही खासदारांनी पत्र लिहून भाजपसोबत जाण्याची मागणी उध्दव ठाकरे uddhav thakrey यांच्याकडे केली आहे.

गेले दोन दिवस चाललेल्या सेना भूकंपात शिवसेनेच्या आमदारांचा मोठा गट शिंदे यांच्या बाजूने गेला , उर्वरित संख्या १८-२०असल्याचे समजते , काल त्यांनी बैठक घेऊन अजय चौधरी यांना गटनेते पदी निवडून तसे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिले . त्यानंतर आज सायंकाळी विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली, त्यात गैरहजर राहणाऱ्याचे सदस्यत्व रद्द होईल अशी नोटीस ही पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून सुनिल प्रभू sunil prabhu यांनी बजावली.

तिकडे दुसरीकडे शिंदे गटाने shinde team विधानसभा उपाध्यक्षांना ३४ आमदारांचे पत्र देत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदी कायम ठेवत सुनिल प्रभू यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवले आणि त्याजागी भरत गोगावले यांना नेमले आहे. यामुळे उपाध्यक्ष कोणाला मान्यता देतात हे स्पष्ट व्हायचे आहे, मात्र त्यानंतरही याचे अंतिम अधिकार राज्यपालांना असल्याने शिवसेनेची स्थिती नाजूक बनली आहे.

दरम्यान आज सायंकाळी प्रभू यांच्या सहीने बोलावलेल्या बैठकीत अनेक खासदार ही अनुपस्थित होते, त्यापैकी भावना गवळी यांनी उध्दव ठाकरे uddhav thakrey यांना पत्र पाठवून भाजपसोबत जाण्याची मागणी केली आहे.

ML/KA/PGB

22 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*