
नवी दिल्ली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी पुन्हा समन्स बजावले. तपास यंत्रणेने काँग्रेस प्रमुखांना जुलैच्या मध्यापर्यंत तपासात सहभागी होण्यास सांगितले. बुधवारी सोनियांनी आपल्या आजारपणाचे कारण देत ईडीला पत्र लिहून चौकशी पुढे ढकलण्याची विनंती केली.
तपास यंत्रणेने काँग्रेस अध्यक्षांची विनंती मान्य केली. सूत्रांचे म्हणणे आहे की कोविड-19 मधून बाहेर आल्यानंतरही सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहू शकत नाहीत.
दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सोनिया गांधी यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. 2 जून रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 12 जून रोजी नाकातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनिया गांधी यापूर्वी 8 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होणार होत्या, परंतु त्यांना कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तपास यंत्रणेकडे वेळ मागितला होता. यानंतर एजन्सीने नवीन समन्स जारी केले आणि त्यांना 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
पाच दिवस चाललेल्या या चौकशीत राहुल गांधींची जवळपास 51 तास चौकशी करण्यात आली. कोलकातास्थित डोटेक्स मर्चेंडाइज प्रायव्हेट लिमिटेडने केलेल्या काही व्यवहारांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
HSR/KA/HSR/ 23 June 2022
Be the first to comment