बहुमत चाचणीची सुनावणी आज संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयात…

दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अपेक्षेप्रमाणे राज्यातील बहुमत चाचणीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पोहोचली असून आज संध्याकाळी ही सुनावणी होणार आहे.

राज्यातील अस्थिर राजकीय वातावरणात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या आदेशाला शिवसेनेने shivsena सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.उद्या सकाळी ही चाचणी घेण्याचे आदेश आज सकाळीच जारी करण्यात आले होते.

शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठीची कारवाई सुरू होताच हा मामला सर्वोच्च न्यायालयात गेला , न्यायालयाने त्याला तात्पुरती स्थगिती देत पुढील सुनावणी ११ जुलै रोजी ठेवली आहे. याच सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या वतीने अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यावर न्यायालयाने संबधित आदेश आल्यावर न्यायालयात या असे म्हटले होते. त्यानुसार राज्यपालांचे आदेश येताच शिवसेनेने shivsena त्याला आव्हान दिले आहे.

आज सकाळी शिवसेनेच्या वतीने वकील अभिषेक मनू संघवी यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सुनावणीची मागणी केली, त्यानुसार आज संध्याकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे.

ML/KA/PGB

29 Jun 2022