मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार….

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले दोन दिवस चाललेल्या प्रचंड उलथापालथी नंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे cm uddhav thakrey यांनी आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचे सांगत नाराज आमदारांना भावनिक साद घातली आहे. सायंकाळी फेसबुक facebook  वर केलेल्या भाषणात त्यांनी हे स्पष्ट केले.

दोन दिवस नाराज गटाच्या नाकदुऱ्या काढाव्या लागलेल्या शिवसेना shivsena नेतृत्वाने आपले सर्व प्रयत्न हतबल ठरल्याचे पाहून थेट फेसबुक लाईव्ह करीत आपल्या सोडून गेलेल्या आमदारांशी संपर्क साधला.

दिलेल्या वेळेपेक्षा तब्बल पस्तीस,चाळीस मिनिटे उशिराने हे फेसबुक लाईव्ह सुरू झाले. आपल्याला पदाचा मोह नाही मात्र परिस्थितीनुसार अनुभव नसताना ही मला हे पद सांभाळावे लागले , त्यात सगळ्यांची साथ मिळाली मात्र आता कोणाला मी मुख्यमंत्री cm पदी नको होतो तर त्यांनी समोर येऊन का सांगितले नाही , इकडून तिकडून अशी मागणी का केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला.आपण राजीनामा पत्र लिहून तयार ठेवले आहे , वर्षा बंगला सोडून मातोश्री वर आजच परत जात आहोत असे ठाकरे यावेळी म्हणाले.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ झाला याचे वाईट वाटल्याचे सांगत आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी भाजपचा उल्लेख टाळला. शरद पवार sharad pawar आणि सोनिया गांधी soniya gandhi यांनी आपल्याला सहकार्य केले याचा आवर्जून उल्लेख करीत आपण भाजपा सोबत जाणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे त्यांनी सूचित केले आहे.

ML/KA/PGB

22 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*