सरकार अल्पमतात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा : केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एकनाथ शिंदे eknath shinde यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले ramdas athavle यांनी व्यक्त केली आहे.

एकनाथ शिंदे eknath shinde यांनी महाविकास आघाडीला दिलेल्या दणक्यात भाजप चा कोणताही हात नाही.

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केल्यामुळे शिवसेनेचे आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आमदार नाराज होते. एकनाथ शिंदे आणि आणि अनेक आमदार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेने ने केलेल्या युतीवर नाराज होते. भाजप सोबत शिवसेनेने युती करावी अशी एकनाथ शिंदें eknath shinde आणि अनेक शिवसेना आमदारांची इच्छा होती.मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरे uddhav thakrey यांनी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीचा चुकीचा निर्णय घेतला.त्यातून एकनाथ शिंदे आणि अन्य शिवसेना आमदारांची नाराजी वाढत गेली. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दणका दिला असून महाविकास आघाडीचे सरकार लवकर कोसळणार आहे.एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेने चे बहुसंख्य आमदार असून महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात गेले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

ML/KA/PGB

22 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*