अखेर संख्याबळ जमले…

अखेर संख्याबळ जमले...

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  शिवसेना विधिमंडळ पक्षात रीतसर फूट पाडून By splitting the Shiv Sena Legislative Party स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ बंडखोर नेते एकनाथ शिंदे Rebel leader Eknath Shinde यांच्याकडे जमले असून त्यांनी एक पत्र विधिमंडळ आणि राज्यपालांना दिले आहे.

शिवसेना घटकपक्षाची बैठक पार पाडून सदर बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले असल्याचे हे पत्र आहे. या पत्रावर शिवसेनेच्या 37 आमदारांची स्वाक्षरी असून The letter has the signatures of 37 Shiv Sena MLAs या पत्राची प्रत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधिमंडळाचे सचिव यांना पाठवण्यात आलेली आहे.

विधिमंडळ पक्षात रीतसर फूट पडण्यासाठी एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी एकत्रित येऊन वेगळा गट स्थापन करण्याची तरतूद नव्या कायद्यानुसार आहे, त्याप्रमाणे शिवसेनेचे सध्या सध्या ५५ आमदार असून ३७ हा आकडा कायद्यानुसार आवश्यक होता, हे संख्याबळ होताच त्यांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले आहे , मात्र यात वेगळा गट स्थापन करण्याची अथवा विद्यमान सरकारचा पाठिंबा काढून घेण्याबाबत काहीही उल्लेख नाही , सध्या फक्त विधिमंडळ पक्षात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न शिंदे Rebel leader Eknath Shinde यांनी केला आहे. काल त्यांच्यासह १२ आमदारांवर पक्षादेश धुडकावल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी उर्वरित गटाच्या माध्यमातून करण्यात आली होती , त्यावर हे उत्तर असल्याचे मानण्यात येत आहे.

ML/KA/PGB

24 Jun 2022

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*