राज्य महिला आयोगाने मागविला चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा

चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओबीसी आरक्षण आंदोलनासमयी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर आयोगाने चंद्रकांत पाटील यांच्या कडून खुलासा मागविला आहे .

महिला आज स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे.
यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेले आहेत.

 

ML/KA/HSR/27 MAY 2022