स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २ आठवड्यात घ्या…

नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओबीसी राजकीय आरक्षण विषयक स्थितीमुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन आठवड्यात जाहीर करा असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. The Supreme Court today ordered that the elections be declared in the next two weeks इतर मागासर्गीयांसाठी राखीव जागा या अनेक ठिकाणी ५०टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने अशा ठिकाणच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या होत्या , राज्यात सर्वच ठिकाणी ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून विवक्षित अटींचे पालन करून आणि तसे निकष लावून त्यानुसार ओबीसी समाजाची गणना तयार करण्याचे ही निर्देश न्याायालयाने दिले होते.  राज्य सरकारने नेमलेल्या आयोगाने याबाबत दिलेला अहवाल न्यायलयाने फेटाळून लावत सरकारला मोठा झटका दिला होता. त्यामुळे ओबीसी समाजात प्रचंड अस्वस्थता पसरून आंदोलने ही झाली आणि सरकार , विरोधी पक्षात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले.Take in 2 weeks …

यावर पुन्हा सरकारने नवीन कायदा करीत राज्य निवडणूक आयोगाचे आधिकर स्वतःकडे घेतले आणि निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलत जिथे पाच वर्षांची मुदत संपली तिथे प्रशासक नेमून तिथली सूत्रे सरकारने अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या ताब्यात ठेवल्या होत्या. मात्र ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रशासक नेमता येत नाही , अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेले जवळपास दोन वर्षे झालेल्या नाहीत त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशानंतर ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. नवी मुंबई ,औरंगाबाद ,वसई विरार ,कल्याण डोंबिवली , ठाणे, कोल्हापूर , नाशिक , मुंबई अशा महापालिकांच्या निवडणुका आता जाहीर कराव्या लागतील असे समजते , राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते हे आता पहावे लागेल.

ML/KA/PGB

4 May 2022